११ एप्रिल रोजी रात्रीय लोक अदालत

ठाणे :- महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांचे निर्देशानुसार जिल्हा सत्र न्यायालय, ठाणे व पालघर जिल्यातील सर्व तालुका न्यायालये, कौटुंबिक न्यायालये, कामगार न्यायालये, सहकार न्यायालये, व इतर न्यायालयांमध्ये आर. एम. जोशी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ठाणे, यांच्या मार्गदर्शनाखाली दि. ११ एप्रिल २०२० रोजी सकाळी १०:३० वाजता राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रीय लोक अदालतीचे दिवाणी स्वरूपाची, फौजदारी स्वरूपाची, वैवाहिक स्वरूपाची, १३८ एन.आय. या अॅक्ट (चेक संबंधिची) अन्वये दाखल झालेली प्रकरणे, बँक वसुली प्रकरणे, मोटर अपघात नुकसान भरपाई प्रकरणेबनो वाद, भूसंपादन प्रकरणे, वीज व पाणी विषयक देयक प्रकरणे, महसूल प्रकरणे तसेच दाखल पूर्व प्रकरणे इत्यादी तडजोडीसाठी ठेवण्यात येणार आहेत. तरी सर्व पक्षकारांना आवाहन करण्यात येत आहे की आपण या संधीचा फायदा घ्यावा व आपली जास्तीत जास्त प्रकरणे लोक अदालतीचे ठेवण्यासाठी ज्या न्यायालयात प्रलंबित असतील त्या न्यायालयाला अर्ज करावा. जिल्हा सत्र न्यायालय, ठाणे व पालघर