स्वतःसह अधिकाऱ्यांसाठी ३५ हजारांची लाच मगितल्याप्रकारणी प्रांत कार्यालयातील लिपिकावर गुन्हा

कल्याण : शेतजमीन कुळ कायद्यानुसार आदेश पारीत करण्यासाठी स्वत:सह अधिकाऱ्यांसाठी ३५ हजारांची लाच मगितल्याप्रकरणी कल्याण प्रांत कार्यालयातील लिपिकावर खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा सी दाखल करण्यात आला आहे. विकास मुगटराव असे या लिपिकाचे नाव आहे. टिटवाळा येथील रहिवासी असणाऱ्या संबंधित तक्रारदाराची नांदप येथे वडिलोपार्जित शेतजमीन आहे. त्यांच्या परिचयाच्या असणाऱ्या व्यक्तीची मुरबाड तालुक्यातील जमीन विक्री करण्यासाठी कल्याण प्रांताधिकरी कार्यालयाकडन परवानगी हवी होती. त्यासाठी तक्रारदाराने गेल्या नोव्हेंबर महिन्यात अर्जही दाखल केला आहे. त्यावेळी लिपिक मूगटराव यांनी या सारी जी यांनी या कामासाठी ५ हजार रुपयांची मागणी केल्याचे सांगत त्यासंदर्भात तक्रारदाराने ठाणे अँटी करप्शनकडे लेखी तक्रारही केली आहे. दरम्यान गेल्या महिन्यात तक्रारदाराने कामासंदर्भात मूगटराव यांची भेट घेतली असता हे काम आता दुसऱ्या लिपिकाकडे आहे. मात्र आपणच हे काम करून देणार असल्याचे मुगटराव यांनी सांगितल्याचे तक्रारीत नमद करण्यात आले आहे. तसेच हे काम करण्यासाठी स्वत:सह अधिकाऱ्यांसाठी ३५ हजारांची मागणी केल्याचेही पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यामध्ये नमूद गावातात करण्यात आले आहे. दरम्यान याप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात मगटराव यांच्याविरोधात खडकपाडा पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.