कल्याण : समाजात महिलांवर होणाऱ्या अत्याचारात झालेली वाढ रोखण्यासाठी कल्याणात बाजारपेठ पोलीस ठाण्यातर्फे 'महिला जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आगामी ८ मार्चला असणाऱ्या जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात १ ते ८ मार्च हा महिला सप्ताह म्हणून जाहीर करण्यात आला आहे. त्याअंतर्गत कल्याणातील महावीर जैन शाळेमध्ये बाजारपेठ पोलीस ठाण्यातर्फे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. गेल्या काही वर्षांत महिला आणि लहान मुलं यांच्यावरील अत्याचारात लक्षणीयरीत्या वाढ झाली असून त्यामूळे महिला वर्गात काहीसे नकारात्मक वातावरण तयार झाले आहे. हे वातावरण बदलून महिलांच्या मनात कायद्याप्रती विश्वास आणि गुन्हेगारमावेशक निर्माण होत आवश्यक गुन्हेगारांमध्ये धाक निर्माण होणे आवश्यक आहे. त्याच उद्देशाने ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी हा महिला जनजागृती सप्ताह आयोजित केला आहे. शहरातील शाळा, कॉलेजेस, सामाजिक संस्थांमध्ये हे जनजागृती कार्यक्रम घेण्यात येत असून महिला अत्याचाराविरोधात असणारे कायदे, तरतुदी यांची माहिती नागरिकांना दिली जात आहे. महिला, बालकांविरोधातील अत्याचार महिलांवरील अत्याचार सहन केले जाणार नाही आणि गुन्हेगारांना कडक शासन केले जाईल ही भावना समाजात रुजण्यासाठी हा कार्यक्रम घेण्यात आल्याची माहिती बाजारपेठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक यशवंत चव्हाण यांनी दिलीदरम्यान महावीर जैन शाळेत आयोजित या कार्यक्रमात शाळेतील शेकडो विद्यार्थी आणि विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या.
जागतिक महिला दिनानिमित्त बाजारपेठ पोलिसांतर्फे कल्याणात 'महिला जनजागृती सप्ताह' उल्या समाजाला चार गुन्हेगारमावेशक निर्माण होत आवश्यक