काय मनुष्यप्राणी जन्माला आल्यावर तो आपल्या पूर्व संचित कर्मानुसार जीवन जगत असतो. जीवनात जे सुख, दु:ख आपल्या वाट्याला येते ते आपण केलेल्या चांगल्या किंवा वाईट कर्मानुसार असते. कर्मे दोन प्रकारची आहेत एक निष्काम कर्म जे परमेश्वराला प्राप्त होते कसलीही फलाची अपेक्षा न करता. दुसरे कर्म जे केवळ स्वार्थासाठी केले जाते ते सकाम कर्म. जीवनात दोन्ही कर्माची बैजीक बेरीज जर निष्काम कर्म येत असेल तर तुमचे जीवन सार्थकी लागले असे समजा परंतु बैजिक बेरीज सकाम कर्म येत असेल तर तुमचा जन्म फुकट गेला असे समजा. मनुष्यजन्मच मुळात जीवन सार्थकी लावण्यासाठी असतो. कलीयुगात मनुष्यप्राणी सकाम कर्मासाठी सतत प्रयत्नशील असतो. मानवाला मातृऋण, पितृऋण व नंतर समाजऋणाची परतफेड करावी लागते. भारतीय संस्कृतिचं जतन करणं हे प्रत्येकाचं आद्य कर्तव्य आहे. शिक्षणाने मनुष्य मोठा होतो असे म्हणतात परंतु आपण उच्च शिक्षित असूनही हुंड्या सारख्या प्रथेला आपण आळा घालू शकत नाही हे किती लांच्छनास्पद आहे. वधुचे आई-वडील लाखो रु. खर्च करुन मुलीला डॉक्टर किंवा इंजिनियर करतात. उच्च शिक्षित मुलीकडूनही समाजातील काही वराचे मातापिता लाखो रुपयाच्या हुंड्याची अपेक्षा करणारे किंवा बाय बाय ची भाषा करणारे हे समाजाला लागलेली एक किडच आहे. समाजातील वराच्या मातापित्याची विचारधारा बदलणे आज आवश्यक आहे. दुसऱ्याचा आत्मा दखवन हंड्याची अपेक्षा करणारे हे वाईट कर्म करणारेच! पैसा, धन, संपत्ती साठी उत्तम व्यवहार करुन योग्य विचाराने तो खर्च करावा. "जोडोनिया धन उत्तम व्यवहारे । उदास विचारे वेच करी." समाजात लग्नात अनाठायी खर्च भरपूर होतो. हाच खर्च लग्नात कमी करुन त्याचा योग्य विनिमय करा. ग्रामीण भागात शेतकरी वराला मुलगी मिळणे दुरापास्त झाले आहे. प्रत्येक आर्थिकदृष्ट्या सबल असलेल्या वधुच्या मातापित्यास चांगल्या वराची अपेक्षा असणे हे साहजिकच आहे. परंतु नशीबापेक्षा जास्त अपेक्षा करणे हे चुकीचे आहे. अंथरुण पाहून आपण पाय पसरविले पाहिजे. त्यामुळे शेतकरी वराला वधु मिळणे कठीण झाले आहे. आपल्या समाजात आज घटस्फोटाचे प्रमाण खूप वाढले आहे. घटस्फोटांची कारणे शोधण्याची वेळ आज आली आहे. विचारवंतांनी समाज परिवर्तन करुन हे प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अन्यथा हा अधर्म होतो. प्रथम धर्माची संकल्पना प्रत्येकास माहित असणे गरजेचे आहे. धर्म म्हणजे काय? धर्म म्हणजे शुध्द आचरण, सत्यता, नितिमत्ता यालाच धर्म म्हणतात. सज्जनांचे रक्षण व दुर्जनांचा संहार यालाच धर्म असे म्हणतात. माणसाचं मन शुध्द असायला हवे. 'मन' अत्यंत चंचल आहे. त्याला आवर घालणे फार कठीण असते. मनाचा ताबा इंद्रीयावर असणे । आवश्यक आहे. परंतु कलीयुगात इंद्रियांच्या ताब्यात मन आहे. इंद्रियांच्या पलीकडे मन, मनाच्या पलीकडे बुध्दी, बुध्दीच्या पलीकडे आत्मा व आत्म्याच्या पलीकडे परमात्मा. माणसाचे काम, क्रोध, मद, मत्सर, लोभ व अहंकार हे सर्वात मोठे शत्रु. ह्या शत्रुवर मात केल्यास मन शुध्द होते व तेव्हा परमात्म्याचा साक्षात्कार होतो. विज्ञानाने मनुष्यप्राणी सुखी झाला परंतु मृत्यू ते जन्म ह्या प्रवासावर विज्ञान मात करु शकत नाही. ८४ लक्ष योनी नंतर मनुष्य जन्म प्राप्त होत असतो. परमेश्वर एका जन्मात मिळत नाही अनेक जन्माची पुण्याई संचित झाल्यावर परमेश्वर साक्षात्कार होवू शकतो. वरील तत्वांचा प्रत्यक्ष जीवनात अवलंब केल्यास निश्चितच खरी समाजसेवा तुमच्या हातून घडेल.
समाजसेवा हीच ईश्वरसेवा