एमआयडीसीकडून सध्या नवीन आहे. तसेच वाहनया जमिनीखाली डोंबिवली :- निवासी भागात एमआयडीसीकडून सध्या नवीन जलवाहिन्या टाकण्याचे काम सुरु आहे. सर्व्हिस रोडवर सुरु असलेल्या कामामध्ये हलगर्जी सुरु असल्याचा आरोप येथील डोंबिवली वेल्फेअर असोसिएशनच्यावतीने करण्यात आला आहे. __ एमआयडीसीकडून नवीन जलवाहिन्या आणि पावसाळी गटार आणि छोटे नाले बांधण्याचे काम सध्या निवासी भागात सुरु आहेत. छोट्या जलवाहिन्यांचे काम ८० टक्के पूर्ण झाले आहे. दान ते अडीच फुट व्यासाच्या जलवाहिनया सर्व्हिस रोडवर जमिनीखालून टाकण्याचे काम सुरु आहे. जाणकारांच्या मते या वाहिन्या टाकताना त्यावर प्लास्टिक कोटींग करणे गरजेचे आहे. तसेच वाहिनया जमिनीखाली टाकताना त्यांच्या खाली व बाजूला काँक्रीटीकरण करणे आवश्यक आहे. पण त्याकडे दुर्लक्ष झाले आहे. कोटिंगचे काम सुरु झाले आहे. जलवाहिन्यांच्या खालच्या काँक्रीटीकरणाकडे मात्र कानाडोळा झाला असल्याकडे डोंबिवली वेल्फेअर असोसिएशनने लक्ष वेधले ७ ___ सध्या सर्व्हिस रोडवर मोठमोठे खड्डे खणून त्याल जलवाहिन्या टाकल्या जात आहेत. या कामामुळे हा रोड खोदण्यात आला आहे. पावसाळ्यानंतर निवासी भागातील जे मोजके रस्ते एमआयडीसीकडून सुस्थितीत आणले होते. त्यापैकी एक असलेल्या सर्व्हिस रोडची या खोदकामामुळे पुन्हा दुर्दशा झाली आहे. एमआयडीसीत जमिनी खालून महानगर गॅसच्या वाहिन्या खालून महानगर गॅसच्या वाहिन्या टाकल्या आहेत. त्याच्याच बाजूला महावितरणाच्या केबल आणि खासगी मोबाईल कंपन्यांच्याही केबल आहेत. जलवाहिन्या आणि गष्टार, नाले बांधकामासाठी खोदकाम करताना सरकारी आणि खाजगी कंपन्याचा एकमेकांशी समन्वय नसल्याने भविष्यात एखादी दुर्घटना घडून जीवित आणि मालमत्तेची हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याबाबतीत गांभीर्याने विचार करुन उपाययोजना करण्यात याव्यात अशीही मागणी डोंबिवली वेल्फेअर असोसिएशनतर्फे करण्यात आली आहे.
सर्व्हिस रोडची दुर्दशा : वेल्फेअर असोसिएशनचे एमआयडीसीला पत्र