कल्याणात मनसेकडून अदृश्य पत्रीपुलाचे उद्घाटन

 कल्याण :- सांगितलेल्या मुदतीत पत्रीपूलाचे काम पूर्ण न झाल्याबद्दल आज कल्याण शहर मनसेतर्फे अनोख्या पद्धतीने आंदोलन करीत सत्ताधायांचा निषेध करण्यात आला. काळे फुगे, जोडीला फटाके आणि जोरदार निषेधाच्या घोषणाबाजीमध्ये आज मनसेने अदृश्य पत्रीपुलाचे उद्घाटन केलेले पाहायला मिळाले. काही महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान फेब्रुवारी २०२० मध्ये पत्रीपुल पूर्ण होण्याचे आश्वासन शिवसेनेतर्फे देण्यात आले होते. मात्र त्याची मुदत उलटूनही अद्याप पत्रीपुल सुरू झाला नसल्याने कल्याण शहर मनसेतर्फे आज हे अनोखे उपहासात्मक आंदोलन केले. पत्रीपुलाच्या गर्डरला जागोजागी निषेधाचे काळे पुगे, आश्वासन पूर्ती न झाल्याबाबतचे फलक जागोजागी दिसत होते. तर मनसेने श्रीफळ वाढवत या अदृश्य पत्रीपलाचे उदघाटन केले. हा अदृश्य पूल पाहता यावा यासाठी विशेष होने ३ डी चष्मेही घालण्यात आले होते. . __ तर पालकमंत्री, खासदार, आमदार आणि महापालिकेमध्ये सत्ता असूनहा शिवसना एवढा महत्वाचा पूल बनवण्यात अपयशी ठरल्याची टिका मनसेचे माजी आमदार प्रकाश भोईर यांनी केली. मनविसे शहराध्यक्ष विनोद हराध्यक्ष विनाद केणे आणि विभागअध्यक्ष कपिल पवार यांच्या संकल्पनेतून हे अनोखे निषेधात्मक आंदोलन करण्यात आले ज्यामध्ये मनसेचे अनेक पदाधिकारी, महिला कार्यकर्ते मोठ्या संख्यने सहभागी झाले होते.