उल्हासनगर :- महापालिकांमधील कर्मचार्यांच्या हजेरी नोंर्दी करिता मनपाच्या प्रवेशद्वारावर बायोमेट्रिक मशीन बसवले आहेत. परंत त्या गेल्या कित्येक महिन्यां पासन सदोष व नादरुस्त आहेत. त्यातील या बिघाडा मुळे कर्मचाऱ्यांच्या हजेरी व्यवस्थित लागत नाहीत. त्यातील वेळाही सदोष असून अंगठ्यांचे ठसे स्पष्टपणे उमटत नाहीत. रामपाल टांक या सुरक्षारक्षकाने रात्री ११ वाजता ड्युटीवर रुजू झाल्यानंतर या मशिन वर अंगठा टेकवून हजेरी लावली होती. मात्र त्या वेळेची नोंद झाली नाही. मात्र सकाळी जाण्याची वेळ मात्र आत यण्याचा वेळ म्हणून सातची वेळ रेकॉर्ड झाली आहेतसेच, रामफल टांक हे सुरक्षा रक्षक ३१ ९ जानेवारी २०२० रोजी सटीवर असतानाही त्यांच्या येण्याची वेळ (०९:४६) आणि जाण्याची वेळ मात्र नोंद झालेली दाखवत होती. परंतु, नोंदवहीमध्ये त्यांच्या योग्य वेळा नोंद झाल्या आहेत. • या अशा बायोमेट्रिक मशीनच्या घोटाळ्यामुळे कर्मचारी हतबल झाले आहेत. सामान्य प्रशासन विभागाने त्वरित या मशीन दुरुस्ती कराव्यात अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे.
मनपातील नादुरुस्त बायोमेट्रिक मशीनमुळे कर्मचारी हैराण