कल्याण :- फेरीवाले आणि अस्वच्छतेनंतर कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आपला मोर्चा आता आपल्या अधिकारी-कर्मचायांकडे वळवला असून वेळेवर कार्यालयात न येणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा अर्ध्या दिवसाचा पगार कापण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. कल्याण डोंबिवली महापालिका मुख्यालयातील विविध विभागांची आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी अचानक केलेल्या पाहणीमध्ये अनेक अधिकारी आणि कर्मचारी हे वेळेवर आले नसल्याचे आढळून आले. त्यामूळे संतप्त झालेल्या आयुक्त सूर्यवंशी यांनी अशा अधिकारी कर्मचायांचा पगार कापण्याचे निर्देश संबंधित विभागाला दिले आहेत. नुकत्याच सादर केलेल्या अंदाजपत्रकात आयुक्त सूर्यवंशी यांनी चांगल्या अधिकारी आणि कर्मचायांचा सत्कार तर कामचुकार कर्मचायांना शिस्त लागण्यासाठी कडक कारवाईचे स्पष्ट संकेत दिले होते. मात्र केडीएमसीच्या अधिकारी-कर्मचायांनी त्यातन कोणताच धडा घेतला नसल्याचे आली आज आयुक्तांनी केलेल्या अचानक पाटणीनंतर दिसन आले तसेच याबाबत - अनेक नागरिकांनी पालिका आयुक्तांकडे या लेटलतीफपणामुळे कामं खोळंबल्याच्या तक्रारी केल्या होत्याया पार्श्वभूमीवर आज सकाळी केडीएमसी मुख्यालयात आयुक्तांनी ही पाहणी केलीयावेळी कार्यालयाची वेळ होऊनही अनेक अधिकारी-कर्मचारी अनुपस्थित होते. आधीच एकीकडे राज्य सरकारने सरकारी अधिकारीकर्मचाऱ्यांसाठी ५ दिवसांचा आठवडा केल्याने नागरिकांकडून काहीशी नाराजी व्यक्त होत आहे. अशात या अधिकारीकर्मचायांच्या लेटलतीफपणामुळे कामावर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु अशा कामचुकार आणि लेटलतीफ कर्मचारी-अधिकाऱ्यांचे अर्धा दिवसाचे वेतन कापून महापालिका आयुक्त सूर्यवंशी यांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. आयक्तांच्या या भमिकेचे नागरिक निश्चितच स्वागत करतील यात कोणतीही शंका नाही
कर्मचाऱ्यांचा पगार कापणार