भाजपापासन वेगळे झालो असून हिंदुत्वापासून नाही

मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनी केले स्पष्ट


अयोध्या :- मुख्यमंत्री म्हणून प्रथमच अयोध्या दौरा करणाऱ्या उध्दव ठाकरे यांनी आपण केवळ भाजपापासन वेगळे झालो असून हिंदुत्वापासून नाही, असे स्पष्ट केले. शिवसेनेतर्फे राममंदिरासाठी १ कोटीच्या देणगीची घोषणा करतानाच मुख्यमंत्र्यांनी अयोध्येत महाराष्ट्र भवनासाठी योगी सरकारला जागा देण्याची विनंती केली.


महाराष्ट्रात सरकारला १०० दिवस पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सहकुटुंब अयोध्या दौरा करत रामलल्लांचे दर्शन घेतले. पत्नी रश्मी ठाकरे आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे त्यांच्यासोबत होते. रामलल्लांचे दर्शन करण्यापूर्वी पत्रकार परिषदेत बोलताना उध्दव ठाकरे म्हणाले की, २०१८ साली मी प्रथम येथे आलो होतो. तेव्हाच मी म्हणालो होतो की, मी नेहमी अयोध्येला येईन. त्यानंतर गेल्या वर्षी मुख्यमंत्री झालो. आता पुन्हा एकदा रामलल्लांच्या आशीवार्दासाठी मी आलो आहे. आता राममंदिराच्या निर्मितीतील सर्व अडथळे दूर झाले आहेत. कालच मला कळले की, ट्रस्टचे एक बँक खातेही उघडण्यात आले आहे. त्यामुळे राममंदिरासाठी मी शिवसेनेच्यवतीने १ कोटी रुपयांच देणगी देत आहे, अशी घोषणा ठाकरेंनी केली. बाळासाहेबांच्या काळापासून राममंदिरासाठी शिळा पाठवण्यात येत होत्या. आता राममंदिर उभे राहिल्यानंतर महाराष्ट्रातील भाविकही येथे येतील. या रामभक्तांसाठी येथे महाराष्ट्र भवन उभारण्याकरीता मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जागा उपलब्ध करुन द्यावी, अशी विनंती मी राज्य सरकारच्यावतीने करत असल्याचे उध्दव ठाकरे म्हणाले. यावेळी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना भाजपा आणि हिंदुत्व दोन स्वतंत्र गोष्टी असल्याचे त्यांनी नमूद केले. आम्ही भाजपापासून वेगळे झालो असलो तरी हिंदुत्व सोडलेले नाही. भाजपा म्हणजे हिंदुत्व नाही, असे उध्दव ठाकरेंनी ठणकावले. मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यात शरयू ठणकावले. मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यात शरयू नदीच्या आरतीचा कायक्रमही प्रस्तावित होता. परंतु कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी खबरदारी म्हणून शरयू आरती रद्द करण्यात आली. मी पुन्हा येईन आणि शरयू आरती करेन, असे उध्दव ठाकरे म्हणाले. आधी उध्दव ठाकरेंचा दौरा व्यापक होता. मात्रं कोरोनामळे तो आटोपता घेण्यात आला. यापूर्वी नोव्हेंबर २०१८मध्ये उध्दव ठाकरेंनी आपला पहिला अयोध्या दौरा केला होता. त्यानंतर गेल्या वर्षी लोकसभेच्या निकालानंतर जून महिन्यात त्यांनी दुसऱ्यांदा अयोध्येला भेट दिली.भाजपापासूनवेगळे झालोअसून हिंदुत्वापासून नाही