जागतिक महिला दिनाची सुरुवात अशी झाली....

काय  महिलांनी स्वत:च्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ ८ मार्च हा दिवस महिला दिन म्हणून साजरा केला जातो. १९१० च्या आंतरराष्ट्रीय परिषदेत मांडलेल्या सूचनेनुसार ८ मार्च हा दिवस महिला दिन म्हणून निश्चित करण्यात आला. पुढे १९७५ हे वर्ष युनोचे जागतिक महिला वर्ष म्हणून जाहीर केले. त्यानंतर स्त्रियांच्या समस्या ठळकपणे समाजासमोर येत गेल्या. स्त्रियांच्या संघटनांना बळकटी आली. बदलत्या सामाजिक, आर्थिक, राजकीय सांस्कृतिक परिस्थितीनुसार काही प्रश्नांचे स्वरुप बदलत गेले. तशी स्त्री संघटनांच्या मागण्याही बदलत गेल्या. विसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत जगभराच्या सर्व स्त्रियांना मतदानाचा हक्क नाकारलेला होता. या अन्यायारुिध्द स्त्रिया आपापल्यापरीने संघर्ष करीत होत्या.


१८९० मध्ये अमेरिकेतमतदानाच्या हक्कासंदर्भात 'द नॅशनल अमेरिकन सप्रेजिस्ट असोसिएशन स्थापन झाली. परंतु ही असोसिएशन सुध्दा वर्णद्वेषी आणि स्थलांतराविषयी पूर्वग्रह असणारी होती. दक्षिणेकडील काळात वर्षाच्या आणि देशांतरित कामगार स्त्रियांनी जोरदार विरोध केला. क्रांतीकारी मार्क्सवाद्यांनी केलेल्या सार्वत्रिक प्रौढ मतदानाच्या हक्कांच्या मागणीला पाठिंबा दिला. १९०७ साली स्टुटगार्ट येथे पहिली आंतरराष्ट्रीय महिला परिषद भरली. त्याममध्ये क्लारा झटकीन या कम्युनिस्ट कार्यकर्तीने सार्वत्रिक मतदानाचा हक्क मिळविण्यासाठी संघर्ष करणे, हे समाजवादी स्त्रियांचे कर्तव्य आहे, अशी घोषणा केली. ८ मार्च १९०८ रोजी न्यूयॉर्कमध्ये वस्त्रोद्योगतील हजारो स्त्री कामगारांनी स्टगर्ट चौकाट जमून प्रचंड मोठी निदर्शने केली. दहा तासांचा दिवस आणि कामाच्या जागी सुरक्षितता या मागण्या केल्या. या दोन मागण्यांबरोबरच लिंग, वर्ण, मालमत्ता आणि शैक्षणिक पार्श्वभूमीनिरपेक्ष सर्व प्रौढ स्त्रीपुरुषांना मतदानाचा हक्क मिळावा, अशी मागणीही जोरकसपणे केली. अमेरिकन कामगार स्त्रियांच्या या व्यापक वृत्तीने क्लारा झेटकीन अतिशय प्रभावित झाली. १९१० साली कोपनहेगन येथे भरलेल्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषदेत ८ मार्च १९०८ रोजी अमेरिकेतील स्त्री कामगारांनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ ८ माच हा जागतिक महिला दिन म्हणून स्विकारावरा, असा जो ठराव क्लाराने मांडला तो पास झाला. यानंतर युरोप, अमेरिका देशात सार्वत्रिक मतदानाच्या हक्कासाठी मोहिमा उघडल्या गेल्या. त्यांचा परिणाम म्हणून १९१८ साली इंग्लंडमध्ये १९१९ साली अमेरिकत या मागण्यांना यश मिळाले.