डोंबिवली :- कल्याण- डोंबिवली महापालिकेच्या आजदे नागरी आरोग्य केंद्रातर्फे कुष्ठरोगाचे निदान आणि बहविध औषधोपचाराबाबत मागदशनाच्या कार्यक्रमाचे आले होते. पेशंट कम्युनिकेशन या राज्य शासनाच्या योजनेअंतर्गत या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. डोंबिवलीमधील २७ गावातील प्राथमिक आरोग्य केंद्र महापालिकेत वर्ग झाल्यानंतर यातील विविध केंद्रांच्या अतंर्गत केंद्र आणि राज्य शासनाच्या आरोग्य योजनेतून विविध प्रकल्प राबिवण्यात येतात. या अंतर्गत सहाय्यक संचालक आरोग्य सेवा कृष्ठराग ठाण याच्या मागदशनाखाला कल्याण-डोंबिवली पालिका अंतर्गत आजदे आरोग्यकेंद्रातर्फे राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रमांतर्गत सागाव येथील संजय नगर येथे सभा घेण्यात आली. गटप्रवर्तक आणि स्थानिक आशा सेविका उपस्थित होत्या. यावेळी न खाजणारा न दुखणार अंगावरचा चटा. तेलकट लालसर, जाडसर होणे, भूवयांचे केस गळणे, कानाच्या पाळ्या जाड होणे, हाता पायाला बधीरपणा येणे अशी लक्षणे असल्यास ताबोडतोब परिसरातील आरोग्य केंद्र किंवा सराकरी दवाखान्यात जावे आणि यावर मोफत औषधे उपलब्ध आहेत त्याचा लाभ घ्यावा अशी माहिती डॉ. शुब्रमण्यम यांनी दिली. या उपक्रमात सागाव सोनापाडा येथील भाजपच्या नगरसेविका डॉ. सुनिता पाटील प्राथमिक आराग्य कद्राच्या वधाकिय आधकारा डॉ. सुब्रमण्यम, कुष्ठरोगतज्ज्ञ अपर्णा " पवार उपस्थित होते.
आजदे गावात कुष्ठरोगाचे निदान आणि औषधोपचाराबाबत मार्गदर्शन